*कृष्णनगर येथे ग्रामीण स्तरीय फुटबॉल स्पर्धेचा उत्साहात बक्षीस समारोप..

मुंबई, दि ३
ता.चामोर्शी श्री. गुरुदेव स्पोर्टिंग क्लब, कृष्णनगर (ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) यांच्या वतीने आयोजित ग्रामीण स्तरीय फुटबॉल स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी खेळाडूंना प्रोत्साहनपर शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात त्यांनी खेळाडूंच्या जिद्दीचे कौतुक करताना म्हटले की, “खेळामुळे तरुणाईत एकात्मता, शिस्त आणि समाजाशी बांधिलकी निर्माण होते. आपल्या गावातील तरुणांनी खेळात यश मिळवावे हीच शुभेच्छा आहे.” तसेच गावातील अडचणी व झालेल्या विकासकामांचा उल्लेख करत त्यांनी, “मी सदैव आपल्या गावाच्या सोबत उभा आहे,” अशी भावनिक हमी दिली.
या वेळी कि.मो.प्र. सचिव रमेशजी भुरसे, भाजप जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, ढालीजी, सुनिल बिश्वास, सुबिर मसिद, रतन सरकार, रजनिकांत बाला, नितेश बैरागी, सुमंत दास, प्रियोतोष मंडल यांच्यासह मोठ्या संख्येने गावातील नागरिक, बंधू-भगिनी उपस्थित होते.
स्पर्धेच्या माध्यमातून गावातील तरुणाईत खेळाची आवड वाढवून आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याचा उद्देश साध्य झाल्याचे आयोजकांनी सांगितले. KK/ML/MS