घरच्या घरी बनवा बाजरी मेथी ढेबरा
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ढेबरा पीठ बाजरीचे पीठ, ताजी मेथीची पाने, काही मसाले, तीळ आणि दही यापासून बनवले जाते.
लागणारे जिन्नस:
बाजरी पीठ – दीड वाटी
गहू पीठ – अर्धी वाटी
ताजी मेथी – १ १/२ ते २ वाट्या
कोथींबीर – १/२ वाटी
दही ताजे (आंबट नको) – वरील पीठ मळण्यासाठी
आले मिरची पेस्ट – आवडीनुसार
धणे जिरे पूड – १ चमचा
काळीमिरी पूड – १/२ चमचा
ओवा – १ चमचा
तीळ – २ चमचे
गूळ पाणी – २ ते ३ चमचे
तूप – १ चमचा
हळद, हिंग
मीठ- चवीनुसार
क्रमवार पाककृती:
दही सोडून सर्व जिन्नस एका परातीत एकत्र करावेत. आता लागेल तसे दही घालून पीठ पराठ्या सारखे मळून घ्यावे. आता मळलेल्या पिठाचे ठेपल्याच्या साईजचे ढेबरे लाटावेत. एकदम पातळ लाटू नका. कडा फाटतात त्यामुळे एकसारखा आकार येण्यासाठी डब्याच्या झाकणाने कडा कापाव्यात. लाटलेले ढेबरे तवा गरम झाला की मंद आचेवर तूप लावून दोन्ही बाजूने भाजून घ्यावेत.
Bajri Methi Dhebra Recipe
PGB/ML/PGB
8 nov 2024