कुस्तिपटू बजरंग पुनियावर ४ वर्षांची बंदी, हे आहे कारण!

 कुस्तिपटू बजरंग पुनियावर ४ वर्षांची बंदी, हे आहे कारण!

कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय टीमच्या सिलेक्शन ट्रायलकरिता नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी (NADA) ला 10 मार्च रोजी राष्ट्रीय संघ निवड टेस्ट दरम्यान डोपिंग चाचणीसाठी नमुना देण्यात नकार दिल्याने चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. NADA ने सुरुवातीला 23 एप्रिल रोजी बजरंग पुनियाला त्याच गुन्ह्यासाठी निलंबित केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता, त्यानंतर त्याला जागतिक प्रशासकीय मंडळ, UWW ने निलंबित करताना त्याला स्पर्धात्मक कुस्तीमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे सांगण्यात आले. डोपिंग विरोधी शिस्तपालन समितीने नियम 2.3 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळल्याने त्याच्यावर बंदी घातली आहे.

बजरंगने सुरुवातीला निलंबनाचा निषेध केला होता, त्यानंतर 31 मे रोजी, NADA तात्पुरते निलंबन मागे घेतले. मात्र, पुन्हा 23 जून रोजी नाडाने त्याला या आरोपांची औपचारिक माहिती दिली. परंतु पुनियाने आरोपांविरुद्ध 11 जुलै रोजी अपील दाखल केले, त्यावर 20 सप्टेंबर आणि 4 ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली. त्यानंतर आता त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *