लवकरच लाँच होणार Bajaj ची CNG बाईक
मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बजाज ऑटोने आपल्या पहिल्या CNG बाईकच्या लाँचची तारीख जाहीर केली आहे. बजाजची ही बाईक जगातील पहिली CNG मोटरसायकल असेल. याआधी जगातील कोणत्याही बाजारपेठेत सीएनजी बाईक लाँच झालेली नाही. बजाज 5 जुलै 2024 रोजी ही जगातील पहिली CNG मोटरसायकल लाँच करणार आहे.रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ही सीएनजी बाईक लाँच होणार असल्याचेही बजाजने सांगितले आहे. तसेच, बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज देखील बाईकच्या लाँचिंगला उपस्थित राहणार आहेत.
बजाजच्या या सीएनजी बाईकच्या टीझरमध्ये असे दिसून येते की या मोटरसायकलमध्ये सपाट सिंगल सीट असणार आहे. या बाईकमध्ये डुअल फ्यूल टँक बसवता येऊ शकते, ज्यामध्ये एक CNG आणि दुसरी पेट्रोल टाकी दिली जाईल. याला दोन इंधन टाक्यांमधून सहजपणे हलवता येऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे. या बाईकची किंमत ठरवणे हे कंपनीसाठी महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.
भारतीय बाजारपेठेत लाँच होणारी ही जगातील पहिली CNG बाईक गेम चेंजर ठरू शकते. कंपनीने त्याचे नाव ब्रुझर असे ठेवले होते. लाँचच्या वेळी या बाईकला नवीन नाव दिले जाऊ शकते. बजाज म्हणतात की सीएनजी मोटरसायकलमुळे पेट्रोलवरील रनिंग कॉस्ट 50 टक्क्यांनी कमी होईल.
ML/ML/SL
19 June 2024