महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाची बृहन्मुंबई महानगरपालिकेत बैठक संपन्न

 महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाची बृहन्मुंबई महानगरपालिकेत बैठक संपन्न

मुंबई, दि. १९
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष श्री. आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे आज (दिनांक १९ नोव्हेंबर २०२५) बैठक पार पडली. बृहन्मुंबई महानगरपालिकेने आर्थिक दुर्बल घटकांवर विविध योजनांच्या माध्यमातून केलेला खर्च, अनुसूचित जातींसाठी प्राप्त होणारा निधी याबाबतचा आढावा यावेळी आयोगाकडून घेण्यात आला. तसेच लाड पागे समिती, अनुकंपा तत्वावरील प्रकरणांची माहिती या बैठकीत घेण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अनुसूचित जातीच्या विविध रिक्त्त पदांच्या भरतीचा अनुशेष भरून काढावा तसेच पदोन्नतीचे विषय तातडीने मार्गी लावण्यात यावेत, असे निर्देश श्री. अडसूळ यांनी प्रशासनाला या बैठकीदरम्यान दिले.

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सचिव श्री. गोरक्ष लोखंडे, महानगरपालिकेचे उपायुक्त (सामान्य प्रशासन) श्री. किशोर गांधी, उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) श्री. यतीन दळवी, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर, संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) (अतिरिक्त कार्यभार) श्री. पुरूषोत्तम माळवदे तसेच विविध विभागांचे प्रमुख याप्रसंगी उपस्थित होते.

स्वच्छता कामगारांसाठीच्या आश्रय योजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच स्वच्छता कामगारांना कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा आयोगामार्फत घेण्यात आला. अनुसूचित जातीसाठी महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या संपूर्ण योजनांची माहिती आयोगाने जाणून घेतली. तसेच दलित वस्तीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या नागरी सेवासुविधांचा आढावा आयोगामार्फत घेण्यात आला.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *