बाईपण भारी देवा, शंभर कोटींच्या उंबऱ्यावर

 बाईपण भारी देवा, शंभर कोटींच्या उंबऱ्यावर

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या राज्यभरातील सिनेमागृहांमध्ये प्रचंड चालत असलेला ‘बाईपण भारी देवा’हा केदार शिंदे दिग्दर्शित चित्रपट लवकरच १०० कोटींवर भरारी घेण्याची चिन्ह दिसत आहेत. ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 1.5 कोटींची कमाई केली आहे. तर रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात या सिनेमाने 12.4 कोटींची कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात 29.95 आणि तिसऱ्या आठवड्यात 21.24 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीत आतापर्यंत या सिनेमाने ७० कोटींचा गल्ला जमवला आहे. अनेक ठिकाणी या चित्रपटामुळे हिंदी चित्रपटांना हटवण्यात आले आहे.

नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’ या सिनेमाने 110 कोटींची कमाई केली होती. तर रितेश देशमुखच्या ‘वेड’ या सिनेमाने 75 कोटींचा गल्ला जमवला होता. आता ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत असून सैराट आणि वेड यांच्या तोडीसतोड असल्याचं पाहायला मिळत आहे.

बाईपण भारी देवा’ सिनेमात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते , सुकन्या मोने ,शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब अशी दमदार अभिनेत्रींची स्टारकास्ट आहे. चित्रपटातील कलाकारांचा उत्तम अभिनय,उत्कृष्ट कथानक,सुरेल गाणी अन् दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या अष्टपैलू दिग्दर्शनामुळे बॉक्सऑफिसवर मराठी चित्रपटाचा अनेक दिवसांनी बोलबाला झाल्याचं दिसून येत आहे. सिनेमाने प्रत्येक स्त्रीला जगण्याचा नवा अर्थ देत स्वतःसाठी जगायला शिकवलं आहे. त्यामुळेच महिला वर्ग या हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी करत आहे.

SL/KA/SL

21 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *