बैलपोळ्याला गाढवाची ही होते पूजा

 बैलपोळ्याला गाढवाची ही होते पूजा

अकोला , दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क):अकोल्यातील अकोट येथे बैलाप्रमाणे गाढवाचीही पूजा करून पोळा साजरा केला जातो. महाराष्ट्रातील लोकजीवनातील बैलपोळा हा सण शेतकरी बैलांच्या शेतीसाठी राबणाऱ्या उपकारांची कृतार्थता प्रकट करण्यासाठी साजरा करतात. आपणावर केलेल्या उपकारांचे मूल्य परत करता येत नाही म्हणून त्याची परतफेड कृतज्ञतेमधून केली जाते.

गाईसाठी ‘गाईगोंधन’, गुराढोरासाठी ‘झेंडवाई’ तर बैलासाठी ‘बैलपोळा’ हे सण लोक साजरे करतात. पोळ्याच्या दिवशी बैल हा नुसता बैल न राहता तो नंदीबैल होतो. त्याच रितीने ज्यांची उपजीविका ही गाढवांवर अवलंबून आहे ते लोक ‘गाढवांचा पोळा’ साजरा करतात. अकोला जिल्ह्यातील अकोट या गावी ही परंपरा सुरू झाली आहे. विशेषत: येथील भोई समाजातील लोक गाढवांची पूजा पोळ्याच्या दिवशी करतात.

ML/KA/PGB 15 Sep 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *