पुण्यातील पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर
पुण्यातल्या कल्याणीनगर भागामध्ये एका उद्योजकाच्या मुलाने भरधाव गाडी चालवत दोघांचा जीव घेतला होता.या पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. कोर्टात अल्पवयीन आरोपीच्या आत्याने याचिका केली होती. ही अटक बेकायदा असल्याचं याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. दरम्यान, अल्पवयीन आरोपीला पुण्यातील बालगृहात ठेवण्यात आले होते. आता त्याला जामीन मिळाला आहे.