बदलापूर घटनेतील अहवाल उघड केल्याप्रकरणी दोन मंत्र्यांना नोटीसा

 बदलापूर घटनेतील अहवाल उघड केल्याप्रकरणी दोन मंत्र्यांना नोटीसा

मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणी पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झालेल्या आरोपी अक्षय शिंदेचा फॉरेन्सिक रिर्पोट उघड केल्याबद्दल अक्षयच्या वकिलाने शिवसेना शिंदे गटातील संजय शिरसाट आणि योगेश कदम या दोन मंत्र्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. त्यावर येत्या दोन दिवसांत उत्तर दिले नाही तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

आरोपी अक्षय शिंदेला एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात हलवित असताना पोलिसांनी एन्काउंटरमध्ये त्याला ठार मारले होते. अक्षयने पोलिसांकडील पिस्तुल हिसकावून गोळीबार केल्यानेच स्वरक्षणासाठी त्याचा एन्काउंटर केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. पोलिसांनी याबाबत न्यायालयात काही पुरावेही सादर केले होते.

मंत्री योगेश कदम यांनी आरोपी अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे पावसात वाहून गेले, ही फॉरेन्सिक अहवालातील गोपनीय माहिती उघड केली होती. मात्र, हे प्रकरण प्रकरण न्यायप्रविष्ट असताना फॉरेन्सिक अहवाल जाहीर करून कदम यांनी गोपनीयतेचा भंग केला, असा आरोप अक्षयच्या वकिलांनी केला.

मंत्री संजय शिरसाट हे अक्षय शिंदेला सातत्याने नराधम म्हणत होते. या प्रकरणाचा निकाल लागण्याआधीच अशाप्रकारचे वक्तव्य करणे आक्षेपार्ह असल्याचे अक्षय शिंदेंच्या वकिलाने पाठविलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे. या नोटीसवर दोन दिवसांत उत्तर दिले नाही तर दोन्ही मंत्र्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा अक्षयच्या वकिलाने दिला आहे. अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट असून यातील ५ पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने याआधीच दिले आहेत.

ML/ML/PGB 30 Jan 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *