बदलापुरमधील नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार, नागरिक आक्रमक, बदलापूरात रेल रोको
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असताना बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित संस्था ही बदलापूरमधील नामांकित शाळा आहे. यामुळे बदलापूरच्या नागरिकांमध्ये संतापाची लाट असून त्यांनी मंगळवारी (20 ऑगस्ट) बदलापूर बंदची हाक दिली आहे. आंदोलक आक्रमक झालं असून आंदोलकांनी रेल्वे स्थानकावर येऊन लोकल अडवली आहे. याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
शाळेतील एका सफाई कर्मचाऱ्याने काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केले. त्यामुळे बदलापूरमधील नागरिक प्रचंड संतापले आहेत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालक आणि बदलापूरमधील नागरिक प्रचंड संतापले आहेत. बुधवारी बदलापूर बंदची हाक देण्यात आली,शाळा प्रशासनाकडून केवळ एक माफीनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. शाळेचे संचालक किंवा अन्य कोणीही पालकांसमोर आलेले नाही.
PGB/ML/PGB
20 Aug 2024