नागपूरात साजरा झाला बडग्या मारबत उत्सव

 नागपूरात साजरा झाला बडग्या मारबत उत्सव

नागपूर, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समाजातील कुप्रथांचे उच्चाटन करण्याचे आवाहन करणारी बडग्या मारबत हे संत्रानगरीचे सांस्कृतिक वैभव आहे. उपराजधानीचे सांस्कृतिक वैभव असलेल्या आणि सव्वाशे वर्षाहून अधिकची परंपरा असलेला बडग्या मारबत उत्सव हा नागपूरचा लोक उत्सव आहे.

नागपूर मध्ये तान्हा पोळ्याच्या दिवशी निघणाऱ्या मारबत मिरवणुकीचा थरार इतवारीतल्या नेहरू पुतळ्याजवळ बघायला मिळत असतो. नागपुरातील इतवारी भागातील नेहरू पुतळ्याजवळ काळी लाल आणि काळी पिवळीचे मिलन झाल्यानंतर बडग्या मारबतीच्या शहराच्या मध्यभागात मिरवणुकीला सुरुवात होत असते. येथे काळी आणि पिवळ्या मारबतीचे मिलन पाहायला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केलेली दिसत होती.

इंग्रजांच्या काळापासून चालू असलेल्या या प्रथेमध्ये मारबत आणि बडगाच्या माध्यमातून समाजातील कृप्रथेवर मात करण्यासाठी मिरवणुकीच्या माध्यमातून बडग्यावर फलक लावून ‘ इडा पीडा घेऊन जा गे मारबत ‘ अशा घोषणा दिल्या जातात. समाजाच्या वाईट प्रथेवर तसेच राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि स्थानिक ज्वलंत मुद्दावर प्रशासनाचे तसेच राजकीय लक्ष वेधण्यासाठी स्लोगन लावून बडगे काढण्यात येत असतात. बडग्या मारबतीची मिरवणूक बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करीत असतात.

ML/ML/SL

3 Sept 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *