भूकंपानंतर तब्बल पाच दिवसांनी सापडले नवजात बाळ

 भूकंपानंतर तब्बल पाच दिवसांनी सापडले नवजात बाळ

अंकारा,दि.१२ (एमएमसी न्यूज नेटवर्क): तुर्कस्तान आणि  सीरियात आलेल्या विध्वंसकारी भूकंपात आत्ता पर्यंत 28 हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अजूनही शेकडो जणांचे मृतदेह सापडत आहेत. यामध्ये एक दिलासादायक घटना घडली आहे. ‘देव तारी त्याला कोण मारी’ यांचा प्रत्यय देणारी एक घटना तुर्कस्तानच्या हेते प्रांतात घडली आहे.

येथील एका इमारतीच्या ढिगाऱ्यातून एक नवजात बाळ सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. भूकंपानंतर तब्बल पाच दिवसांनी हे बाळ जिवंत हाती लागल्यामुळे बचाव पथकात हर्षोल्हासाची नवी लाट पसरली आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

नवजात बाळ जिवंत सापडल्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यात ते बाळ बचाव पथकातील एका व्यक्तीचे बोट तोंडात घेऊन दूध ओढण्याचा प्रयत्न करत आहे.  एनडीआरएफच्या पथकाने एका 8 वर्षीय मुलीला सुरक्षित बाहेर काढले होते.

भारताचे एनडीआरएफ पथकही तुर्कियेत बचाव मोहीम राबवत आहे. या पथकाने गुरूवारी गाजियांटेप प्रांतातील नूरदगी शहरातील बचाव मोहिमेत एका 6 वर्षीय मुलीची ढिगाऱ्याखालून सुखरूप सुटका केली होती. भारतीय पथक ऑपरेशन दोस्ती अंतर्गत हे मदतकार्य राबवत आहे.

अशी दैवयोगाने बचावलेली बालके आणि माणसं भीषण आपत्तीत जगण्याचं बळ देत आहेत.

SL/KA/SL

12 February 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *