लाऊडस्पीकर बंदीवर पर्याय म्हणून ‘अजान अॅप’ लाँच

मुंबईत ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मशिदींवरील लाऊडस्पीकरवर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे मुस्लीम बांधवांच्या सोईसाठी अजान अॅप्लिकेशन लाँच करण्यात आले आहे. मुंबईतील अर्धा डझन मशिदींनी या मोबाईल अॅप्लिकेशनवर नोंदणी केली आहे. यामुळे नमाज करणाऱ्यांना अजानची वेळ कळणार आहे. यामुळे ध्वनी प्रदूशनाला आळा बसणार आहे. ऑनलाइन अजान नावाचे हे अॅप्लिकेशन तामिळनाडूच्या एका कंपनीने तयार केले आहे.
अजान अॅप युजर्सला नमाजच्या वेळेबद्दल माहिती देते, एकदा इंस्टॉल केल्यानंतर ते ऑटोमॅटिक चालते. त्यामुळे नमाज ऐकणाऱ्यांनी सांगितले की, ‘लाऊडस्पीकर बंद असतानाही, आम्ही आता मोबाइल फोनद्वारे शेजारच्या मशिदीच्या अजानचा आवाज ऐकू शकतो.
ऑनलाइन अजान हे अॅप बनवणाऱ्यांपैकी एक मोहम्मद अली यांनी सांगितले की, ‘अॅप विकसित करणारी कंपनी तीन वर्षे जुनी आहे आणि तामिळनाडूमध्ये 250 मशिदी यावर रजिस्टर आहेत. यावर रजिस्टर करण्यासाठी एका फॉर्म भरून द्यावा लागतो, तसेच मशिदीचा पत्ता पुरावा आणि अजान देणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड द्यावे लागते. यानंतर मशिद रजिस्टर होते.
‘Azaan App’ launched as an alternative to loudspeaker ban