आयुष चे विद्यार्थी केंद्रित तसेच समाजोपयोगी उपक्रम

 आयुष चे विद्यार्थी केंद्रित तसेच समाजोपयोगी उपक्रम

नाशिक, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : AYUSH (आयुर्वेद, योग , निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी) च्या पारंपरिक चिकित्सा पद्धतींचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि AYUSH अंतर्गत येणाऱ्या या चिकित्सा पद्धतींचा तथा सिद्धांतांचा केवळ पुस्तकी अभ्यास न करता वि‌द्यार्थ्यांनी त्यांचा प्रत्यक्ष चिकित्सेसाठी उपयोग करून समाजाच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे या उ‌द्देशासह जिज्ञासा आपल्या LEARN AYUSH TO PRACTICE AYUSH ह्या बोधवक्यासह विद्यार्थी केंद्रित तसेच समाज उपयोगी विविध उपक्रम सातत्याने राबावत आहे.

आज आयुर्वेद तथा अन्य पारंपरिक चिकित्सा पद्धतींना जागतिक स्थरावर आरोग्य व्यवस्थेमध्ये उल्लेखनीय स्थान मिळत असताना त्यादृष्टीने आपली शिक्षण व्यवस्था हे जागतिक आव्हान पेलण्यासाठी सक्षम बनवण्याची आवश्यकता आहे. यासाठी AYUSH च्या शैक्षणिक परिघातील प्रशासकीय अधिकारी, वैद्यकीय विद्यार्थी, अध्यापक आणि वैद्य या सर्वांनी एकत्र येऊन अभ्यासक्रमात अपेक्षित बदल घडवून आणणे यासाठी जिज्ञासा प्रयत्नशील आहे.

दरवर्षी आयुष क्षेत्रातल्या विध्यर्थ्यांसाठी जिज्ञासा आंतरराष्ट्रीय परिषद बेंगळूरु, कर्नाटक येथे आयोजित होत असते. ह्या वर्षी प्रथमच ही परिषद महराष्ट्रात आयोजित होत आहे. ११ , १२ एप्रिल रोजी गुरुदक्षिणा सभागृह, नाशिक येथे संपन्न होणार आहे. विद्यार्थी निधीच्या मध्यमाथून आयोजित होत असलेल्या ह्या परिषदेत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक तथा आयुर्वेद महाविद्यालय नाशिक सह आयोजक म्हणून ह्या परिषदेमध्ये सहभागी होत आहेत. तसेच आयुष संचलनालय महाराष्ट्र राज्य या परिषदेस सहाय्य करत आहे. या जिज्ञासा परीषदेत देशभरतून 1,500 वि‌द्यार्थी प्राध्यापक, वैद्य तसेच आयुष क्षेत्रातील विविध भागधारक सहभागी होणार आहेत.

जिज्ञासा आंतरराष्ट्रीय परिषद २०२४ चे पोस्टर अनावरण २० मार्च रोजी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी वि‌द्यापीठाचे प्रा. डॉ. मिलिंद निकुंभ (माननीय प्र. कुलगुरु, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान वि‌द्यापीठ, नाशिक), वैद्य गीतांजली कार्ले (आयुष विभाग प्रमुख), वैद्य श्वेता चौधरी (सहयोगी प्राध्यापिका, आयुष विभाग), रोहन मुक्के (संचालन समिती सचिव, जिज्ञासा आंतरराष्ट्रीय परिषद २०२४), प्रा. वैद्य विनय सोनंबेकर (प्राचार्य, आयुर्वेद महावि‌द्यालय नाशिक), प्रा. प्रदीप वाघ (अभाविप नाशिक महानगर अध्यक्ष), ओम मलुंजकर (अभाविप नाशिक महानगर मंत्री) उपस्थित होते.

ML/ML/SL

21 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *