आयुष मंत्रालयाकडून हिवाळ्यात या भाज्या खाण्याची शिफारस
नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोजागरी पौर्णिमेनंतर आता देशभर हळूहळू थंडीची चाहूल लागते. थंडगार आणि आरोग्यदायी अशा या हिवाळ्याच्या काळात शरीराची योग्य काळजी घेतल्यास वर्षभऱ आरोग्य उत्तम राहते असे आयुर्वेदात मानले जाते. गोड गुलाबी थंडी सर्वांनाच आवडते पण या काळात रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असते आणि संसर्गामुळे एखादी व्यक्ती सहजपणे आजारी पडू शकते. अशावेळी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने शरद ऋतूतील ऋतूचर्या अर्थात थंडीत रोजचा आहार कसा असावा याबाबतच्या सूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या आहेत.
आयुष मंत्रालयाने म्हटले आहे की,ळी रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारा आहार घेतल्यास फ्लू, ताप, खोकला, सर्दी हे आजार बरे होऊ शकतात. हिवाळ्यातील आहारात पडवळ, दूध, कारले, रताळ, मुळा, गाजर, बीटरूट आणि पांढरे पेठे यांचा समावेश करण्यास सांगितले आहे. साधे पिण्याचे पाणी हिवाळ्यात हानी पोहोचवू शकते, त्यात काही गोष्टी टाकण्याचाही सल्ला दिला आहे.
आयुष मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हिवाळ्यात पाणी पिण्यापूर्वी ते उकळी येईपर्यंतउकळले पाहिजे. 75 टक्के पाणी उरले की मग ते बाहेर काढले पाहिजे आणि आता यात पित्तदोष कमी करणाऱ्या औषधी वनस्पती – पुनर्णव, लोधरा, आवळा आणि घालून हे पाणी प्यायल्याने फायदा होतो.
SL/KA/SL
29 Oct. 2023