राम जन्मभूमी वर झाली नाट्य निर्मिती अयोध्या

सिंधुदुर्ग, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आयोध्येमध्ये राम मंदिर साकारले आहे, या मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना 22 जानेवारी रोजी होत आहे. मात्र हे राम मंदिर अनेक वर्षाच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होत आहे त्यावेळी कारसेवकांनी दिलेल्या आहुती , लालकृष्ण अडवाणी यांनी काढलेली रथयात्रा, न्यायालयीन संघर्ष ते आता निर्माण होत असलेले मंदिर या सर्व प्रवासाची थीम घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांना घेऊन अयोध्या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे.
या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग नुकताच वेंगुर्ले येथील मधुसूदन कालेलकर नाट्यगृहात संपन्न झाला. या प्रयोगाला रसिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. सिंधू संकल्प अकादमी आणि सागर इंटरप्राईजेस यांनी हे “भारत वर्षातील अलौकिक धर्मयुद्ध” ‘अयोध्या’ ह्या नाटकाची निर्मिती केली आहे .
या नाटकाचे लेखक दिग्दर्शक केदार देसाई तर निर्माते प्रणय तेली आहेत. अयोध्या या नाटकामध्ये स्थानिक कलाकार आणि तंत्रज्ञ मिळून 25 जणांची टीम आहे.
या नाटकाची अतिशय दर्जेदार मांडणी केली आहे . अयोध्या नाटकामध्ये त्या काळातील कारसेवकांचा लढा , राम मंदिर बनण्यासाठी काढलेली रथयात्रा , त्यातून विरोधकांनी केलेली राजकीय खेळी तसेच न्यायालयीन संघर्ष आणि त्यानंतर राम मंदिर बांधण्यापर्यंतचा प्रवास चलचित्रांच्या माध्यमातून आणि संवादातून मांडला आहे. राम आणि सीतेचे मंदिर निर्माण, नंतर झालेला प्रवेश आणि केलेला जयजयकार हे दृश्य रसिकांचे डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले. Ayodhya is a theatrical production on Ram Janmabhoomi
ML/KA/PGB
18 Jan 2024