अन्नाची नासाडी टाळा आणि कचऱ्याचं व्यवस्थापन करा
मुंबई, दि. (एमएमसी न्यूज नेटवर्क): संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या फूड इंडेक्सनुसार ग्राहकांसाठी दुकानात, रेस्टॉरंट्समध्ये आणि घरात उपलब्ध असलेल्या अन्नापैकी 17% टक्के अन्न वाया जातं. त्यात घरात वाया जाणाऱ्या अन्नाचा वाटा मोठा आहे.
वाया गेलेलं अन्न कुजतं, तेव्हा त्यातून मिथेन वायू बाहेर पडतो. जागतिक तापमानवाढीसाठी हा वायूही कारणीभूत आहे. वर्ल्ड वाईल्डलाईफ फंडच्या अंदाजानुसार अन्नाची नासाडी थांबवली, तर माणसाकडून होणारं हरितवायूंचं उत्सर्जन 6 ते 7 टक्क्यांनी कमी होऊ शकतं. Avoid food wastage and manage waste
अन्न उरलं किंवा वाया गेलंच तर कंपोस्ट बनवता येईल. अगदी लहान घराच्या बाल्कनीतही कंपोस्टिंग करता येतं. पण ते शक्य नसेल, तर तुमच्या सोसायटीत किंवा गावात कंपोस्ट प्लांट बसवण्यासाठी प्रयत्न करा.
निदान घरात ओला-सुका कचरा वेगळा ठेवा. सुक्या कचऱ्यातील धातू आणि प्लॅस्टिकसारख्या गोष्टी रिसायकल करा.
ML/KA/PGB
Sep 2023