अवकाळी पावसाचा तडाखा,
संत्रा बागांना नुकसान..

अमरावती दि १६– अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह काल सायंकाळी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील ऊसळगव्हाण येथे शेतात उभा असलेला बीएसएनएल टॉवर वादळी वाऱ्याने जमिनीवर कोसळला. यात टॉवरचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच उन्हाळी हंगामात असलेल्या भुईमूग,संत्रा पिकाला देखील मोठा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. मात्र या पावसामुळे तापमानात घट झाली असून नागरिकांनी उष्णतेपासून सुटकेचा निश्वास टाकला आहे. ML.MS