विनाचालक ट्रॅक्टरद्वारे ऑटो पायलट ट्रॅक्टर पेरणी

अकोला, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेती कामे करण्यासाठी वेळेवर मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो त्यावर उपाय म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करीत अकोला जिल्हयातील शेतकरी राजु वरोकार यांच्या शेतात विना चालक ऑटो पायलट ट्रॅक्टरद्वारे पेरणीचा आधुनिक प्रयोग यशस्वी ठरला असून ही यंत्रणा जीपीएस तंत्रज्ञानावर आधारीत आहे.
अकोला जिल्ह्यात यावलखेड येथील तंत्रज्ञानस्नेही शेतकऱ्याने पेरणीचा नवा प्रयोग केला आहे, ‘जीपीएस कनेक्ट’ या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीनची पेरणी करण्यात आली. हा राज्यातील पहिला प्रयोग असल्याचा दावा शेतकऱ्याने केला.कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.‘जीपीएस कनेक्ट’ या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विनाचालक ट्रॅक्टरद्वारे सोयाबीनची पेरणी करण्यात आली.
जर्मन तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रात पहिल्यांदाच वापर होत असल्याची माहीती युवा शेतकरी विजेंद्र वरोकार यांनी दिली.हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका रेषेत सरळ पेरणी होत असल्याने शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर ठरत आहे.शेती विकसित करण्यासाठी विविध प्रयोगराजू वरोकार यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतामध्ये सोयाबीन पेरणीचा अनोखा प्रयोग केला.जीपीएस कनेक्ट’ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून चालकाविना चालणाऱ्या ट्रॅक्टरद्वारे शेतामध्ये सोयाबीनची पेरणी करण्यात आली.शेतात ट्रॅक्टरद्वारे पेरणी करण्यासाठी चालकाची गरज नाही. पेरणी अगदी सरळ होते. यासाठी जर्मन तंत्रज्ञानाचे उपकरण लावण्यात आले आहे. हे उपकरण शेताच्या एका बाजूला ठेवावे लागते. ‘जीपीएस कनेक्ट’द्वारे ते उपकरण ट्रॅक्टरशी जोडले जाते. त्यावरून विनाचालक ट्रॅक्टरचे संपूर्ण नियंत्रण होते. सरळ रेषेमध्ये ट्रॅक्टर स्वतःहून पेरणी करतो त्यामुळे हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो असा आशावाद आत्मा प्रकल्प संचालक मुरली इंगळे यांनी व्यक्त केला.
पेरणीच्या वेळेवर मजूर न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे अनेकदा नुकसान होते त्यामुळे विना मजूर विना चालक ट्रॅक्टरद्वारे पेरणी करण्याचा यशस्वी प्रयोग राज्यातील तंत्रस्नेही शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकेल हे निश्चित.