आपत्ती काळातील मदतीसाठी प्राधिकरण सज्ज

 आपत्ती काळातील मदतीसाठी प्राधिकरण सज्ज

ठाणे, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे जिल्ह्यात पावसाळ्यात घडणाऱ्या आपत्तीच्या वेळेस तातडीने मदत पोचावी, तसेच आपद्गग्रस्तांना संकटातून बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सज्ज झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संकट निवारणासाठी पूरप्रवण आणि दरडप्रवण गावांना स्थानिक प्रशासनामार्फत फोल्डिंग स्ट्रेचर, बहुद्देशीय लाईफ जॅकेट, रेस्क्यू किट, डिझाटर किट, बॉडी कव्हर बॅग आदी आवश्यक साहित्याचे वाटप प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी दिली आहे.

पावसाळ्याच्या काळात ठाणे जिल्ह्यात दरड कोसळणे, पूरपरिस्थिती निर्माण होणे, अतिवृष्टी, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती येण्याची संभावना असते. अशा नैसर्गिक आपत्ती काळात तातडीने मदत पोहचविणे व संकटग्रस्तांना संकटातून बाहेर काढण्यासाठी विविध साहित्याची आवश्यकता असते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून अशा प्रकारचे साहित्य स्थानिक स्वराज्य संस्था, तहसील कार्यालयांना वाटप करून हे साहित्य दरडप्रवण गावे, पूररेषेजवळील गावांना दिले जाते. या वर्षी प्राधिकरणाच्या वतीने मोठ्या प्रमाणात साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये फोल्डिंग मल्टिपर्पज स्ट्रेचर (1705 संच), फ्लोटिंग अँड फोल्डिंग स्ट्रेचर व इतर साहित्य (710 संच), आपत्ती व्यवस्थापन किट साहित्य/रेस्क्यू किट (550 संच), बहुद्देशीय बॉडी कव्हर बॅग (1260 संच) आणि नाविन्यपूर्ण जीवरक्षक जॅकेट (1190 संच) या साहित्याचा समावेश आहे.
यामध्ये ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महापालिका, मिरा भाईंदर महापालिका, भिवंडी-निजामपूर महापालिका, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ नगरपरिषद, कुळगाव बदलापूर नगरपरिषद यांना प्रत्येकी 60 बहुद्देशीय स्ट्रेचर –(मोठे), 25 मध्यम आकाराचे स्ट्रेचर, 40 फ्लोटिंग अँड फ्लोडिंग स्ट्रेचर, 25 डिझास्टर मॅनेजमेंट किट, 60 बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट, 50 बहुद्देशीय बॉडी कव्हर बॅग (मोठे) आणि 10 बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट, 50 बहुद्देशीय बॉडी कव्हर बॅग (मोठे) देण्यात आले आहेत. तर ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, शहापूर, मुरबाड तहसील कार्यालये व मीरा भाईंदर अपर तहसील कार्यालयांना प्रत्येकी 100 बहुद्देशीय स्ट्रेचर –(मोठे), 40 मध्यम आकाराचे स्ट्रेचर, 50 फ्लोटिंग अँड फ्लोडिंग स्ट्रेचर, 50 डिझास्टर मॅनेजमेंट किट, 100 बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट, 100 बहुद्देशीय बॉडी कव्हर बॅग (मोठे) आणि 10 बहुउद्देशीय नाविन्यपूर्ण लाईफ जॅकेट, 50 बहुद्देशीय बॉडी कव्हर बॅग (मोठे) देण्यात आले आहेत.

डोंबिवली दुर्घटनेतही साहित्याची झाली मदत

ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील पूरग्रस्त गावे/प्रभाग आणि दरडग्रस्त गावांना या साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. या साहित्यामुळे आपत्ती काळात तातडीने मदत पोहचण्यास व संकट निवारण करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.
नुकत्याच डोंबिवली येथे झालेल्या स्फोटाच्या घटनेच्या वेळी डोंबिवली महानगरपालिकेला यापूर्वी दिलेल्या अशा साहित्यांचा मोठा उपयोग झाला आहे. तसेच यापूर्वीही झालेल्या विविध आपत्तीकाळातही या साहित्यांचा उपयोग होत आहे.

हा आहे उपयोग

एखादी व्यक्ती उंच इमारतीवर अथवा आगीत अडकली तर त्या व्यक्तिला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी हे स्ट्रेचर उपयुक्त ठरणार आहे. तसेच हे स्ट्रेचर पाण्यावर तरंगणारे असल्यामुळे पूर परिस्थितीत त्याचा उपयोग होणार आहे. रेस्क्यू रोपद्वारे इमारतीमधून अथवा अडचणीच्या जागेतून/दऱ्या खोऱ्यातून सुखरुपणे काढण्यासाठी उपयोग होणार आहे.

फोल्डिंग मल्टीपर्पज स्ट्रेचर (संसर्ग रोधक) सोबतच या सोबतच्या किटमध्ये अंबू बॅग, कार्बन मास्क, हँड ग्लोज, सॅनिटायझर, शिट्टी, प्रेशर बॅंडेज/सेनेटरी पॅडस कॉडियेट पाईप, नेक बेल्ट, रेस्क्यू रोप, लिक प्रूफ लगेज बॅग, ऑईनमेंट, कापूस आदी साहित्याचा समावेश आहे.
रेस्क्यू किटमध्ये अनेक छोट्या मोठ्या जीवनरक्षक सुरक्षित नावीन्यपूर्ण साधनांचा समावेश आहे. त्यामुळे हा संच शोध व बचाव पथक पोहचण्यापूर्वी उपयोगात येऊन जीवित व वित्त हानी टाळण्यास उपयुक्त ठरणार आहे. या संचामध्ये कार्बन मास्क, हँड ग्लोज, कॉम्पॅक्ट स्ट्रेचर, रिचार्जेबल रेस्क्यू टॉर्च, नेक बेल्ट, शिट्टी, रोलर बँडेज, लाल रंगाचे त्रिकोणी तसेच मेडिकेटेड बँडेज, सक्शन पंप, जखम साफ करण्यासाठी व निर्जंतुकीकरण करण्यासाठी औषध, रेस्क्यू रोप, टूल किट, टूल किट, सीपीआर मास्क सर्च लॅम्प आदी सुमारे 34 उपयुक्त साहित्यांचा समावेश आहे.

साहित्य वापराचे प्रशिक्षण होणार

आपत्त्कालीन परिस्थितीत मदतीसाठी पूरग्रस्त व दरडप्रवण गावांना दिलेल्या साहित्य कसे वापरावे, त्याची देखभाल कशी करावी याचे प्रशिक्षणही संबंधित गावातील कर्मचारी, आपदामित्र व हे साहित्य वापरणारे कर्मचारी यांना देण्यात येणार आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, ठाणे महापालिका आपत्ती निवारण दल, नागरी संरक्षण दल व सामाजिक संस्थेच्या तज्ज्ञांकडून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

आपत्त्कालीन परिस्थितीत संकटग्रस्तांना तातडीने मदत करण्यासाठी व त्यांची सुटका करण्यासाठी हे साहित्य उपयुक्त ठरणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ यांनी सांगितले.

ML/ML/SL

7 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *