ऑस्ट्रेलिया सरकारने केला रतन टाटांचा बहुमान
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय उद्योगपती रतन टाटा यांची ऑस्ट्रेलिया-भारत संबंध, विशेषत: व्यापार, गुंतवणूक आणि परोपकारासाठी विशिष्ट सेवेसाठी ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’वर नियुक्ती करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचे गव्हर्नर जनरल यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.
ऑस्ट्रेलिया-भारत संबंधांना पाठिंबा दिल्याबद्दल, रतन टाटा हे ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया च्या जनरल डिव्हिजनमध्ये मानद अधिकारी म्हणून नियुक्तीसह औपचारिक राष्ट्रीय मान्यता प्राप्त करण्यास पात्र आहेत, असे गव्हर्नर जनरल कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त बॅरी ओ’फॅरेल ट्विट करून म्हटले आहे की, “ऑस्ट्रेलिया-भारत संबंध, विशेषतः व्यापार, गुंतवणूक आणि परोपकारासाठी विशिष्ट सेवेसाठी श्री रतन टाटा यांना ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया (AO) चे मानद अधिकारी म्हणून नियुक्त केले जात आहे.”
SL/KA/SL
18 March 2023