दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे नाव बदलले

 दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे नाव बदलले

नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

राजधानी दिल्लीतील मुघलकालिन राज्यकर्त्यांच्या नावाच्या खुणा मिटवून तेथील बागा आणि रस्ते यांची नावे बदलण्याचा सिलसिला गेली काही वर्षे सातत्याने सुरू आहे. आता नवी दिल्ली नगरपालिका परिषदेने (एनडीएमसी) लुटियन्स दिल्लीतल्या एका लेनचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगजेब लेन मध्य दिल्लीत अब्दुल कलाम रोड आणि पृथ्वीराज रोडला जोडते. या लेनला पूर्वी औरंगजेब लेन असं नाव होतं. जे बदलून डॉ. एपीजे अब्दुल कलाम लेन असं करावं याबाबत एक प्रस्ताव सदस्य समितीसमोर ठेवण्यात आला होता, ज्याला काल (२८ जून) मंजुरी देण्यात आली.

याआधी ऑगस्ट २०१५ मध्ये एनडीएमसीने औरंगजेब रोडचं नाव बदलून डॉ. एपीजे अब्दुल कलाम रोड असं केलं होतं. पूर्व दिल्लीचे तत्कालीन खासदार महेश गिरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या रस्त्याचं नाव बदलण्याची विनंती केली होती. त्यानंतर औरंगजेब रोडला डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव देण्यात आलं.

एनडीएमसीचे उपाध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, लेनचं नाव बदलण्याचा प्रस्ताव नवी दिल्ली म्युनिसिपल अॅक्ट १९९४ च्या कलम २३१ च्या उप-कलम (१) च्या खंड अ संदर्भात मांडण्यात आला होता. त्यानंतर औरंगजेब लेनचं नामकरण डॉ. एपीजे अब्दुल कलाम लेन असं करण्यास परिषदेने मान्यता दिली आहे.

SL/KA/SL

29 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *