लिलाव बंद , कांदा सडण्याची शेतकऱ्यांना धास्ती…
नाशिक, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सलग पाच दिवसांपासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव ठप्प झाले आहेत. या सहा दिवसांमध्ये सुमारे ७ लाख क्विंटलपेक्षा अधिक कांद्याची आवक ठप्प झाली आहे. या आवकेच्या रूपाने सुमारे १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल खोळंबली आहे. दरम्यान उद्या पणनमंत्र्यांकडे होणाऱ्या बैठकीकडे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
तत्पूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कांदाही सडण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर पणनमंत्र्यांकडे होणाऱ्या बैठकीपूर्वी आज महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने लासलगाव बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बैठक बोलावली आहे. व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला पाठिंबा देण्याची घोषणा काही शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केली आहे . वाढीव निर्यात शुल्क पूर्णपणे रद्द करणे ही त्यातील मुख्य मागणी आहे.
ML/KA/SL
25 Sept. 2023