बंजारा घाटी संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न

 बंजारा घाटी संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बंजारा समाजाच्या अनेक मूलभूत समस्या असताना, मागील काही वर्षांपासून धर्माधशक्तिकडून बंजारा घाटी संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.Attempts to destroy the Banjara Valley culture बंजारा घाटीवरील हे धर्मांध संकट परतवून लावण्यासाठी बंजारा समाजातील परिवर्तनवादी विचाराचे लोक “बंजारा घाटी (संस्कृती) संरक्षण आणि संवर्धन अभियान” घेऊन एकत्र आलेले आहेत.आपल्या घाटीवरील हे सांस्कृतिक आक्रमन परतवून लावण्यासाठी संवैधानिक मार्गाने आंदोलन करू असा इशारा बंजारा इंटिलेक्च्युअल फोरमने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

बंजारा समाजाची जातीगत जनगणना होणे, बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गांचे आरक्षण मिळणे, गीर बोलीचा आठव्या सूचीत समावेश होणे, तांडा डेव्हलपमेंट कार्पोरेशनची निर्मिती करणे, क्रिमिलेयरची अट रद्द करणे, तांड्यातील विद्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळणे, तांड्यात आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होणे, तांड्याला रस्ता, पाणी, विज अशा मुलभूत भौतिक सुविधा उपलब्ध करणे अशा अनेक समस्या आहेत. या ज्वलत समस्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील गोद्री तांडा येथे २५ ते ३० जानेवारी २०२३ या कालावधीत अखिल भारतीय हिंदू बंजारा व लबाना नायकडा समाज यांच्या संयुक्त सहकार्याने कुंभमेळा आयोजित करण्यात आला आहे.

हा मेळावा आयोजित करून बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज यांचे क्रांतिकारकत्व विचार पुसून टाकण्याचा हा कुटील डाव आहे.असे बंजारा घाटी संरक्षण आणि संवर्धन अभियानाचे म्हणणे आहे. या पत्रकार परिषदेला डॉ. प्रकाश राठोड (नागपूर),डॉ शाम मुडे (देऊळगाव-राजा), श्रीमती कलाबाई मोतीराज राठोड़ (औरंगाबाद),श्रीमती मायादेवी राठोड़ (इंदौर), श्रीमती अँड. अरुणा राठोड़ (आर्णी-यवतमाळ), मोहन राठोड (नांदेड),
राजपाल राठोड (औरंगाबाद), उल्हास राठोड व अंबरसिंग चव्हाण (मुंबई)आदी उपस्थित होते.

SW/KA/PGB
12 Dec .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *