बदलापूरमध्ये ATS ची कारवाई , संशयीत डॉक्टरला अटक

 बदलापूरमध्ये ATS ची कारवाई , संशयीत डॉक्टरला अटक

बदलापूर, दि. ४ : ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर म्हणून झपाट्याने विकसित होणारे बदलापूर गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमुळे चर्चेत येत आहे. त्यातच आज उत्तर प्रदेश एटीएसने बदलापूरात मोठी कारवाई केली आहे. एटीएसने बदलापूर येथून एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव ओसामा शेख असल्याची माहिती समोर आली आहे. ताब्यात घेतलेली व्यक्ती एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम करत होती. त्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल सेलला बदलापूर येथे एक संशयीत डॉक्टर असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर टीमने बदलापूर मधून एक डॅाक्टरला ताब्यात घेतले आहे . स्पंदन नावाच्या हॅास्पिटलमध्ये हा डॅाक्टर RMO म्हणून काम करतो. ⁠ओसामा शेख असं त्याचे नाव असून त्याला कोर्टात हजर करुन त्याचे ट्रान्सफर वॅारंट UP ATS ने घेतले आहे .

एटीएसने ताब्यात घेतलेला व्यक्ती ⁠अरमान अली नावाच्या एका दहशतवादी संघटनेशी संबंधीत आहे. हा व्यक्ती आरोग्य खात्यात कामाला होता.तो अरमान अलीच्या संपर्कात होता. ⁠ओसामा शेख याने काही मुस्लिम मुले अरमानच्या संपर्कात आणली होती असा संशय UP ATS ला आहे . मुलांचे ब्रेन वॅाश करणं त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध संघटनांच्या संपर्कात आणण्याचे काम ओसामा शेख याने केले आहे असा संशय UP ATS ला आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *