आपच्या मुंबई अध्यक्ष प्रीती मेनन – शर्मा याच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Atrocity case filed against AAP Mumbai president Preeti Menon-Sharma
मुंबई दि.27( एम एमसी न्यूज नेटवर्क): आम आदमी पक्षाच्या वाढीसाठी जीवाचे रान करणाऱ्या मराठी कार्यकर्त्यांना कुठल्याही निर्णय प्रक्रियेत सहभागी करून न घेता उलट त्यांनाच जातीवाचक शिविगाळ करून पक्षातून निलंबित करणाऱ्या आपच्या मुंबई अध्यक्ष प्रीती मेनन – शर्मा आणि मनू पिल्लाई यांच्या सह 20- 25 अज्ञात कार्यकत्यांविरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक (अट्रॉसिटी) कायद्या- नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी माहिती आपचे मुंबई प्रवक्ते ॲड.राकेश राठोड व डॉ. संजय कांबळे- बापेरकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
आम आदमी पार्टीच्या स्थापनेपासून म्हणजे 2012 पासून आम्ही पक्षासाठी अतोनात कष्ट घेतले आहेत. जीवाचे रान करून पार्टीसाठी पैसा, वेळ आणि ताकद पणाला लावली आहे. दिल्ली आणि पंजाबच्या विजयानंतर महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टीचा विस्तार व्हावा ही आमची प्रगल्भ आहे. आम आदमी पार्टीचे नेते व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतूत्वाखाली पक्षाने नावलौकिक प्रस्थापित केला आहे. आम आदमी पार्टी ही भ्रष्टाचार मुक्त, प्रामाणिक आणि पारदर्शक रित्या लोकांना नागरी सुविधा उत्कृष्ट पद्धतीने पोहोचवाव्या यासाठी ओळखली जाते.
10 मार्च 2023 रोजी तिथीनुसार महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती होती . या जयंती निमित्ताने ऑफिस समोर असलेला शिवाजी महाराजांचा पुतळ्याला एक साधा पुष्पहार पण चढवलेला नव्हता. हे बघून आम्ही कार्यकर्ते व्यतीत झालो. आमच्या भावना दुखावल्या गेल्या. आम्ही ही बाब पक्षाध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिली . त्यांनी ‘ ये कोई बडी बात नही ‘ असे म्हणून या गंभीर विषयाकडे दुर्लक्षित केले.
त्याच दिवशी आम्हाला कुठलीही पूर्वत नोटीस नोटीस न देता आप मुंबई चकाला कार्यालयात बोलावण्यात आले. आम्ही तिथे गेलो असता तिथे 25-30 जणांचा जमाव होता. श्रीमती प्रीती मेनन – शर्मा यांनी काही जणांना खुणावलं आणि ऑफिसचे दरवाजे बंद झाले. संजय कांबळे – बापरेकर यांनी प्रीती शर्मा मेनन यांना घडलेला प्रकार सांगितले असता, त्यांनी संजय बापरेकर यांना जातीवाचक शिवी दिली. तसेच त्यांच्या अंगावर आणि आमच्या सर्वांच्या अंगावर इतर सर्वांनी आमच्यावर हल्ला केला.
आम्हाला सर्वांना तिथे डांबून ठेवले गेले आणि आम्हाला व्यक्तिगत खूप घालून पडून बोललं गेलं. त्यांनी व्यक्ती स्वातंत्र्याचा गळा तर दाबलाच पण आम्हाला खूप खूप निर्दयीपणे आमचं खच्चीकरण केल.
आम्ही आम आदमी पार्टी मध्ये आप मुंबई अंतर्गत खूप काही कामे केली आणि पक्ष वाढवण्यासाठी जीवाची परिवाराची हाल अपेक्षिठा केली. शेवटी आम्हाला जातीवाचक खालच्या पातळीची भाषा वापरून पक्षातून काढण्यात आलं. असे सांगून राठोड म्हणाले की,संजय कांबळे – बापरेकर यांना प्रीती मेनन यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याने त्यांच्या विरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार केली.पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन आपच्या मुंबई अध्यक्ष प्रीती मेनन – शर्मा आणि मनू पिल्लाई यांच्या सह 20- 25 अज्ञात कार्यकत्यांविरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक (अट्रॉसिटी) कायद्या- नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जर पोलिसांनी त्यांना अटक केली नाही तर महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ही ऍड. राठोड यांनी दिला.
यावेळी आपचे मुंबई उपाध्यक्ष रमेश देशमुख प्रवक्ते राजेश सामंत ,सोशल मीडिया समन्वयक जयंत देशमुख आदीनी ही प्रीती शर्मा यांच्या कारभारावर सडकून टिका केली.
SW/KA/SL
27 March 2023