चालत्या ट्रेनमधून काढता येतील आता पैसै, पंचवटी एक्सप्रेसमध्ये ATM सेवा सुरू
 
					
    रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वेतच एटीएम मशीनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना आता रेल्वेतून प्रवास करताना एटीएम मधून पैसे काढणे शक्य होणार आहे. मनमाड- मुंबई सीएसटी धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये ही सुविधा महाराष्ट्र बँकतर्फे उपलब्ध करण्यात आली आहे. भारतातील ही पहिलीच एटीएम सेवा आहे.
 
                             
                                     
                                    