वर्षअखेरीस भांडवली बाजारात( Stock Market) जल्लोष.
मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत
२०२१ या वर्षाचा शेवटचा दिवस बाजरासाठी उत्साहवर्धक ठरला. सलग दोन आठवडे एका पातळी भोवती फिरत असणाऱ्या बाजाराने या वर्षातील शेवटच्या दिवशी कमाल केली. बुल्सनी बाजाराची कमान आपल्या हातात घेतली. चौफेर खरेदीच्या जोरावर बाजारात १% वाढ झाली.निफ्टीने १७,४०० ची पातळी गाठली.
२०२१ हे वर्ष बाजारासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरले.बाजारात अनेक विक्रमाची नोंद झाली.परिस्थिती प्रतिकूल असून सुद्धा भारतीय बाजाराने इतर जागतिक बाजारांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली. नवनवीन विषाणूचे प्रकार जन्माला येत असून देखील बाजाराने कमाल केली. याची प्रमुख कारणे रिटेल गुंतवणूकदारांची वाढ,अर्थव्यवस्थेत होत असलेला सुधार,लसीकरणातील वेग तसेच भारतीय वस्तू आणि सेवा क्षेत्रात होत असलेली वाढती मागणी. या जोरावर बाजाराने २४% अधिक वाढ दिली. १९ ऑक्टोबर २०२१ रोजी सेन्सेक्सने ६२,२४५.४३ व निफ्टीने १८,६०४.४५ चा विक्रमी स्तर गाठला.दिग्गज समभागांबरोबर स्मॉल कॅप व मिडकॅप शेअर्सची कामगिरी सुद्धा दमदार झाली, यात अनुक्रमे ३७% व ६१% वाढ झाली.२०२१ मध्ये सगळी सेक्टर्स तेजीत बंद झाली.बीएसई पॉवर आणि मेटल सेक्टर ६० % वाढला तर बीएसई आय.टी,रिअल इस्टेट आणि कॅपिटल गुड्स इंडेक्सने ५०% हुन अधिक वाढ दिली.२०२१ रोजी एकूण ६३ IPO आले त्यातील १६ IPO नी लिस्टिंगच्या दिवशी ५०% अधिक वाढ दिली. २०२१ मध्ये विदेशी गुंतवणूकदारानी ९३,३०५ करोड रुपयांची विक्री केली.
२०२२ मध्ये बाजारासमोर अनेक आव्हाने आहेत, मागील वर्षातील प्रचंड वाढीमुळे बाजाराचे वॅल्युएशन, अमेरिकेतील व्याज दर, आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमती, भारतातील व्याज दरातील संभाव्य वाढ, कोविडच्या तिसऱ्या लाटेची भीती, केंद्रीय अर्थसंकल्प व काही प्रमुख राज्यात होणाऱ्या निवडणूका.
या आठवड्यात निफ्टीने १७,४०० पर्यंत मजल मारली येणाऱ्या काळात निफ्टीसाठी १७,२००-१७१५० चा स्तर अत्यंत महत्वाचा आहे तसचे वरती १७,५००-१७५५० हे महत्वाचे स्तर आहेत.
प्रचंड चढ उतारा नंतर बाजाराचा सकारात्मक बंद. Market ends higher amid volatility
सकाळच्या सत्रातील घसरणीनंतर बाजाराने आपल्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी उसळी घेतली.सेन्सेक्स ५५० अंकांनी घसरला,निफ्टीने १६,८३३ चा तळ गाठला व दिवसभरात १७,११२ चा वरचा स्तर गाठला.आशियाई बाजारात संमिश्र वातावरण होते. नव्या विषाणूचा प्रसार वेगाने होत असला तरी मृत्यूदर कमी असल्याने बाजाराने उसळी घेतली. Tech Mahindra,ICICI Bank,Cipla या समभागात खरेदीमुळे बाजार वर गेला. बाजार बंद होताना सेन्सेक्स ३३४ अंकांनी वधारून ५७,४५९ या स्तरावर बंद झाला व निफ्टी९२ अंकांनी वधारून १७,०९६ चा बंददिला. Markets turn positive in late morning deals after falling over 550 points in opening trade on Monday.
निफ्टीने १७,२०० चा टप्पा केला पार.Nifty above 17,200
मंगळवारी बाजाराने आपली तेजी कायम राखली. बाजाराची सुरुवात मजबुतीने झाली व सत्र संपेपर्यंत ती टिकवण्यात बाजार यशस्वी झाला.निफ्टीने १७,२०० चा टप्पा पार केला. INFOSYS, HDFC BANK, RILआणि L&T या समभागात खरेदीने बाजारात जोश भरला.निफ्टीमधील ५० पैकी ४६ व सेन्सेक्स मधील ३० पैकी २७ शेअर्स मध्ये खरेदी झाली. १६ डिसेंबर नंतर निफ्टी १७,२०० चा वर बंद झाला. बाजार बंद होताना सेन्सेक्स ४७७ अंकांनी वधारून ५७,८९७ या स्तरावर बंद झाला व निफ्टी१४७ अंकांनी वधारून १७,२३३ चा बंददिला.
सेन्सेक्समध्ये ९० अंकांची घसरण. Sensex down 90 points
सलग दोन दिवसांच्या तेजीनंतर वर्षाच्या शेवटच्या मंथली एक्सपायरीच्या अगोदर बाजार सुस्त होता. बाजारात नफावसुली झाली. बाजाराची सुरुवात देखील सपाट झाली. दिवसभरात बाजार एका विशिष्ट पातळीभोवती फिरत होता. मेटल,बँकिंग,IT या क्षेत्रावर दबाव होता परंतु ऑटो आणी फार्मा समभागात खरेदी झाली त्यामुळेच निफ्टीला १७,२०० च्या वर बंद भाव देता आला. खूप दिवसांनी बाजारात विदेशी गुंतवणूकदारानी (FIIs) खरेदी केली. बाजार बंद होताना सेन्सेक्स ९० अंकांनी घसरून ५७,८०७ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १९ अंकांनी घसरून १७,२१३ चा बंददिला.
बाजाराने दिला सपाट बंद. Market ends flat
या वर्षीच्या शेवटच्या वीकली एक्सपीयरीच्या दिवशी बाजार दिवसभरात एका विशिष्ट पातळीभोवती फिरत राहिला. बाजार सुस्त होता .बाजाराची सुरुवात घसरणीच्या झाली. परंतु दुपारच्या सत्रात बाजार सावरला,निफ्टीने १७,२०० चा टप्पा गाठला.IT, FMCG, आणी pharma वगळता बाकी क्षेत्रात कमजोरी दिसली. बाजार बंद होताना सेन्सेक्स १२ अंकांनी घसरून ५७,८९४ या स्तरावर बंद झाला व निफ्टी०९ अंकांनी घसरून १७,२०४ चा बंददिला.
बाजाराची कमान बुल्सच्या हाती.
सलग दोन आठवडे एका पातळी भोवती फिरत असणाऱ्या बाजाराने २०२१ या वर्षातील शेवटच्या दिवशी कमाल केली. बाजाराची कमान पुन्हा एकदा बुल्सनी आपल्या हातात घेतली.बाजार एक टक्क्याहून अधिक वाढला. जानेवारी सिरीजची सुरुवात चांगली झाली.चौफेर खरेदीच्या जोरावर बाजार दिवसभराच्या उच्चतम पातळी जवळ बंद झाला. निफ्टीने १७,४०० ची पातळी गाठली.बाजार बंद होताना सेन्सेक्स ४५९ अंकांनी वधारून ५८,२५३ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १५० अंकांनी वधारून १७,३५४ चा बंददिला,Sensex Reclaims 58,000, Nifty Crosses 17,300 On Last Session Of 2021; Reliance,Titan Gain.
(लेखक शेअर बाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.)
ML/KA/PGB
1 Jan 2021