६१ व्या वर्षी राजू गणपत कोळी यांना ६ डिग्री ब्लॅकबेल्ट …

अलिबाग दि २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
नुकत्याच झालेल्या ५० व्या गोल्डन ज्युबली गोशीन- रियु कराटे फेडरेशन मलेशिया आयोजित कराटे स्पर्धा, ब्लॅकबेल्ट परिक्षा, पंच परिक्षा ११ ते १४ डिसेंबर २०२४ असे चार दिवसाचे शिबिर , मेटॉवर हॉटेल सिल्का मलेशिया येथे आयोजित करण्यात आले होते. ६१ वर्षांच्या राजु गणपत कोळी यांनी यात सहावा डिग्री ब्लॅक बेल्ट प्राप्त केला आहे.
कोळी यांनी मास्टर काता सोचीन आणि गोज्युशियोशो सादर करून ग्रँडमास्टर सोके क्लेमनसु, प्रमुख परीक्षक पाच गोशिनरियुचे सिनियर परिक्षक यांच्यावर प्रभाव पाडून ते या परिक्षेत वयाच्या ६१ व्या वर्षी ६ डिग्री ब्लॅकबेल्ट उत्तीर्ण झाले. तसेच त्यांनी पंच परीक्षाही पास केली. सिहान राजु गणपत कोळी हे गोशिनरियु कराटे अँसोशिएशन इंडियाचे अध्यक्ष आहेत. त्यांना सिहान वसंतन के डब्लूकेएफ लायसन कोच सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, विएतनाम , जकार्ता, इंडीया चे गोशिनरियुचे कोच यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
ML/SL/ML
28 Dec. 2024