राज्यभरात अखेर वळीवाचा पाऊस …

 राज्यभरात अखेर वळीवाचा पाऊस …

सिंधुदुर्ग, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यभरात मौसमी पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा असतानाच आज राज्यभरात वळीवाच्या पावसाला सुरूवात झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळी पाच ते सहा च्या सुमारास मान्सून पूर्व पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. त्यानंतर दुपारी ४ वाजल्या पासून विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे अचानक आलेल्या पावसाने सर्वांची तारांबळ उडाली. भात पेरणी करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतकरी मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत.

छ. संभाजीनगर
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड शहरासह तालुक्यात सायंकाळी 5 वाजल्या पासून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली . सिल्लोड तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला.

चंद्रपूर :

आज सायंकाळी ६ च्या सुमारास जिल्ह्यातील बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले. वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे नवरगाव, ब्रम्हपुरी तालुक्यातील काही घरे आणि गुरांच्या गोट्यांचे छपरे उडाल्याची घटना घडली आहे.

ML/KA/SL

10 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *