जालना इथे पोलिसांचे शहरातील मुख्य मार्गांवरून पथसंचलन

जालना, दि, २५ (एमएमसी न्युज नेटवर्क) : जालन्यात दंगा नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दल आणि स्थानिक पोलिसांनी शहरातील मुख्य मार्गांवरून पथसंचलन केले. जिल्ह्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला असून मराठा बांधव तसेच ओबीसी बांधव हे आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन, उपोषणे करीत आहे.
त्यासोबत नाताळ आणि नवीन वर्ष त्या अनुषंगाने कायदा , सुव्यवस्था अबाधित राहावी मुख्य रस्त्यांवर दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दल तसेच स्थानिक पोलिसांनी पथसंचलन केले. यात जवळपास 120 अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.
SL/KA/SL
25 Dec. 2023