स्पेसएक्स कंपनीतर्फे अंतराळवीरांनी केला पहिला खासगी स्पेसवॉक
एलॉन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ या खासगी कंपनीतर्फे अवकाशात गेलेल्या अंतराळवीरांनी गुरुवारी (12 सप्टेंबर) दुपारी सव्वातीनच्या सुमारास (भारतीय वेळेनुसार) यशस्वीपणे ‘स्पेसवॉक’ केला. हा जगातील पहिला ‘खासगी स्पेसवॉक’ आहे. ‘स्पेसएक्स’च्या पोलारिस डॉन मोहिमेद्वारे 4 अंतराळवीरांनी 10 सप्टेंबरला उड्डाण केले होते.