अंतराळवीर शुभांशू शुक्लाचा परतीचा प्रवास सुरू

 अंतराळवीर शुभांशू शुक्लाचा परतीचा प्रवास सुरू

शुभांशू शुक्ला यांच्यासह चार अंतराळवीर आज १४ जुलै रोजी दुपारी ४:४५ वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर रवाना झाले. सुमारे २३ तासांच्या प्रवासानंतर, त्यांचे ड्रॅगन अंतराळयान १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता समुद्रात उतरेल. याला स्प्लॅशडाउन म्हणतात. हे अंतराळयान २६३ किलोपेक्षा जास्त माल घेऊन परत येईल. त्यात नासाचे हार्डवेअर आणि ६० हून अधिक प्रयोगांमधील डेटा समाविष्ट असेल. अवकाश संशोधनासाठी हे खूप महत्वाचे आहे.

चारही अंतराळवीर २६ जून रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी ४:०१ वाजता आयएसएसवर पोहोचले. अ‍ॅक्सियम मिशन ४ अंतर्गत, अंतराळवीर २५ जून रोजी दुपारी १२ वाजता निघाले. स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटला जोडलेल्या ड्रॅगन कॅप्सूलमधून ते केनेडी स्पेस सेंटरमधून उड्डाण करत होते. तांत्रिक बिघाड आणि हवामानाच्या समस्यांमुळे हे अभियान 6 वेळा पुढे ढकलण्यात आले.

शुभांशूने मोहिमेदरम्यान ६० हून अधिक वैज्ञानिक प्रयोगांमध्ये भाग घेतला. यामध्ये भारतातील सात प्रयोगांचा समावेश होता. त्याने अवकाशात मेथी आणि मूगाचे बीज वाढवले. त्याने ‘स्पेस मायक्रोअल्गी’ प्रयोगातही भाग घेतला. शुभांशूने अवकाशात हाडांच्या आरोग्यावरही प्रयोग केले.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *