विकास कामे स्थगिती आणि ध्वनी यंत्रणा बंद पडल्याने विधानसभा पडली बंद
नागपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थसंकल्पात तरतूद केलेली कामे नव्या सरकारने थांबवली या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाल्याने आणि नंतर सभागृहातील ध्वनी यंत्रणाच बंद पडल्याने विधानसभा कामकाज तब्बल सात वेळा तहकूब करावे लागले.
अशी कामे रोखणे हे चुकीचे, सत्ता येत जात असते मात्र कामं थांबवली हे योग्य नाही विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या या मुद्द्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना नोंद घेत अधिक बोलण्यास परवानगी नाकारली
त्यामुळे विरोधक आक्रमक झाले , जागा सोडून पुढे गेले आणि गदारोळ सुरू झाला .
आमची कामं तुम्हीच रोखली होती , मात्र आम्ही ते लक्षात ठेऊन काम करत नाही असं वित्तमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तरतुदीप्रमाणे पैसे न देता अधिक पैसे देण्याची व्यवस्था केली त्यालाच स्थगिती दिली आहे, तेही तपासून पाहावे लागेल, आमदनी अठन्नी खर्चा रुपया असं चालणार नाही असे फडणीसांनी सांगितले.
अध्यक्षांनी प्रश्नोत्तरे पुकारली मात्र विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिला, तानाशाही नही चलेगी , स्थगिती सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा सुरू झाल्या. मात्र गोंधळात प्रश्नोत्तरे सुरू झाली, प्रश्नोत्तराच्या तासात विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिल्याने सभागृहाचं कामकाज तीन वेळा तहकूब करावं लागलं. त्यानंतर ही एकदा कामकाज तहकूब करण्यात आलं, त्यामुळे एकूण चार वेळा कामकाज सुरुवातीला तहकूब झालं होते.
अधिवेशन संपण्यापूर्वी सर्व पक्षीय गट नेत्यांची बैठक बोलावून विकास कामे स्थगिती बद्दल चर्चा करण्यात येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितलं आणि कामकाज पुढे सुरू झाले.
यानंतर लक्षवेधी सूचना सुरू असताना सभागृहातील ध्वनी यंत्रणाच बंद पडली दोन वेळा प्रत्येकी दहा मिनिटे कामकाज तहकूब करूनही ती सुरू होऊ न शकल्याने आणखी अर्धा तास कामकाज तहकूब करण्यात आले, त्यानंतर ही यंत्रणा अखेर सुरू झाली आणि कामकाज पूर्ववत झाले.shutdown of the sound system
ML/KA/PGB
20 Dec .2022