या वर्षी होणार 9 राज्यांच्या विधानसभा निवडणूका
नवी दिल्ली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगांसाठी हे वर्ष चांगलेच व्यग्रतेचे जाणार आहे. कारण या वर्षात देशातील तब्बल ९ राज्यांच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. 2024 मध्ये लोकसभा निवडणूका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनाही आपली ताकद आजमावण्यासाठी या विधानसभा निवडणूका महत्त्वाच्या ठरणार आहेत.
मध्यप्रदेश, त्रिपुरा, कर्नाटक, मेघालय, नागालॅंड, मिझोराम, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगड या ९ राज्यामध्ये या वर्षभरात निवडणूका होणार आहेत. यांपैकी ६ राज्यांमध्ये भाजप व मित्रपक्षांची सत्ता आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसची सत्ता असून तेलंगणामध्ये भारतीय राष्ट्र समितीचे सरकार आहे. या तीन राज्यांमध्येही भाजपाची सत्ता यावी आणि सहा राज्यांमधील सत्ता टिकावी यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
एकूणच या निवडणूकांच्या निमित्ताने हे वर्ष निवडणूक आयोग, राजकीय पक्ष, राजकीय विश्लेषक आणि पत्रकारांसाठी धामधुमीचे जाणार असे दिसून येत आहे.
SL/KA/SL
2 Jan. 2023