AskDISHA 2.0 आवाजावरून रेल्वे तिकीट बुकिंग करणारे App

मुंबई, दि. ३० : IRCTC ने लॉन्च केलेले AI-संचालित चॅट बॉट AskDISHA 2.0 App वापरून तुम्ही आता तुम्हाला नुसत्या आवाजावरून तिकीट बुकिंग किंवा रद्द करू शकता. ही सुविधा हिंदी, इंग्रजी, गुजराती किंवा इतर भाषांमध्ये बोलून सुचना केल्यावर तुमचे तिकीट बुक करू देते. यासाठी तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर IRCTC मध्ये टाकावा लागेल, त्यानंतर OTP टाकून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल.
अपयशी व्यवहारासाठी री-ट्राय पर्याय – जर व्यवहार अपयशी ठरला असेल, तर वापरकर्त्यांना १५ मिनिटांच्या आत तो पुन्हा करण्याची संधी मिळते.
OTP-आधारित प्रमाणीकरण – IRCTC खाते संकेतशब्द आठवण्याची गरज नाही, कारण OTP आधारित लॉगिन प्रणाली सुलभ आणि सुरक्षित आहे.
त्वरित परताव्याची सुविधा – रद्दीकरण किंवा अपयशी व्यवहारासाठी परतावा जलद मिळतो.