Asian Games – आजपर्यंत भारताच्या खात्यात ८ सुवर्ण, १२ रौप्य आणि १२ कांस्य अशी ३२ पदके जमा
हांगझोऊ, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चीनमधील हांगझोऊ येथे आज भारतीय नेमबाजांनी आजही चमकदार कामगिरी सुरूच ठेवली.नेमबाजांनी आज 2 सुवर्ण आणि 2 रौप्यपदक जिंकले. टेनिसमध्ये रामकुमार रामनाथन आणि साकेथ मायनेनी यांनी पुरुष दुहेरीत रौप्यपदक जिंकले.
यासह भारताने 30 पदके जिंकली आहेत. ज्यामध्ये 8 सुवर्ण, 11 रौप्य आणि 11 कांस्यपदकांचा समावेश आहे. भारत पदकतालिकेत चौथ्या स्थानावर आला आहे. चीन 173 पदकांसह पहिल्या, दक्षिण कोरिया 88 पदकांसह दुसऱ्या आणि जपान 82 पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
भारताला 10 मीटर एअर पिस्तूल महिला सांघिक स्पर्धेत सहाव्या दिवशी पहिले पदक मिळाले. ईशा सिंग, पलक आणि दिव्या यांनी १७३१ स्कोअर करत रौप्यपदक जिंकले. या स्पर्धेत चीनचा संघ अव्वल राहिला. चीनच्या संघाने १७३६ स्कोअर करून सुवर्णपदक जिंकले. तर चायनीज तैपेई संघाने १७२३ स्कोअर करून कांस्यपदक जिंकले.
पुरुष संघाने 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये भारताचे 7 वे सुवर्ण मिळवले. ऐश्वर्य प्रताप सिंग, अखिल शिरोन आणि स्वप्नील सुरेश यांनी १७६९ गुण मिळवून सुवर्णपदक जिंकले. नेमबाजीतील भारताचे हे पाचवे सुवर्ण आहे. या स्पर्धेत चीनच्या संघाने १७६३ गुणांसह रौप्यपदक तर दक्षिण कोरियाने १७४८ गुणांसह कांस्यपदक जिंकले.
टेनिसमध्ये आज पुरुष दुहेरीत भारताला रौप्यपदक मिळाले. भारतीय जोडी साकेथ मायनेनी आणि रामकुमार रामनाथन यांना अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. दोघांनाही रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. चायनीज तैपेईच्या जेसन आणि यू-ह्स्यू यांनी साकेथ आणि रामकुमार यांचा 6-4,6-4 असा पराभव केला.याशिवाय मिश्र दुहेरी प्रकारात रोहन बोपण्णा आणि रुतुजा भोसले या जोडीचा उपांत्य फेरीत चायनीज तैपेईच्या खेळाडूंशी सामना होणार आहे. या जोडीसाठी पदकही निश्चित आहे.
ML/KA/SL
29 Sept. 2023