Asian games – भारताने घडविला इतिहास, पदक संख्या शंभरीच्या पार
गाऊंझाऊ, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे सुरु असलेल्या Asian Games च्या आजच्या १४ व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी ६ सुवर्णपदके जिंकली आहेत.तसेच आजपर्यंत 28 सुवर्ण पदकांसह एकूण १०७ पदकांची कमाई करत आजवरची Asian Games मधली सर्वोत्तम कामगिरी करत इतिहास रचला आहे.आज भारतीय कबड्डीच्या महिला आणि पुरुष संघाने सुवर्णपदक जिंकले. तसेच अफगाणिस्तानसोबत खेळला जाणारा पुरुष क्रिकेटचा अंतिम सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. अव्वल सीडिंग संघ असल्याने भारताला विजेता घोषित करण्यात आले. त्यामुळे क्रिकेटमध्येही भारताने सुवर्णपदक जिंकले. तिरंदाजी (2 सुवर्ण), बॅडमिंटनमध्येही आज भारताने सुवर्णपदकांची कमाई केली. ओजस देवतळे तसंच ज्योती सुरेखा वेण्णम यांनी कंपाऊड तिरंदाजीमध्ये आज सुवर्णपदक पटकावलं. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने प्रथमच पदकांचा 100 टप्पा ओलांडला आहे. आज दिवस अखेर २८ सुवर्ण , ३८ रौप्य आणि ४१ कांस्य अशा एकूण १०७ पदकांसह पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानी स्थिर आहे.
आज भारतीय महिला कबड्डी संघाने अंतिम फेरीत चायनीज तैपेईचा 26-25 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. पुरुष संघाने इराणचा 33-29 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. बॅडमिंटन पुरुष दुहेरी स्पर्धेत सात्विक-चिराग जोडीने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते.
चीनमधील ग्वांगझू येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 24 सप्टेंबर रोजी भारताला नेमबाजीत पहिले पदक मिळाले. तेव्हापासून विजयाची घोडदौड सुरूच आहे. यापूर्वी, 2018 जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सर्वाधिक 70 पदके जिंकली होती.
आजच्या दिवसाची सुरुवात तिरंदाजीच्या कंपाऊंड वैयक्तिक महिला स्पर्धेत दोन पदकांनी झाली. भारताला पहिले पदक अदिती गोपीचंद स्वामीने कंपाऊंड वैयक्तिक महिला तिरंदाजीमध्ये जिंकले. कांस्यपदकासाठी झालेल्या या लढतीत अदितीने मलेशियाच्या रतिह फडलीचा 146-140 असा पराभव केला.
SL/KA/SL
7 Oct. 2023