Asian Games – मिश्र दुहेरी टेनिस आणि मेन्स स्क्वॅशमध्ये भारताला सुवर्णपदक
हांगझोऊ, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एशियन गेम्स स्पर्धेचा आजचा सातवा दिवस भारतासाठी खूपच चांगला ठरला. एशियन गेम्स 2023 मध्ये भारतीय खेळाडूंकडून दिवसेंदिवस चांगली कामगिरी होत आहे. आज मेन्स स्क्वॅशच्या फायनल मॅचमध्ये भारतीय टीमने पाकिस्तानच्या टीमला पराभूत केलं आहे. भारतीय टीमने पाकिस्तानचा 2-1 ने पराभव करत गोल्ड मेडल पटकावलं आहे.
तसेच आज रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले यांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. एशियन गेम्स 2023 मध्ये या जोडीने टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकावले आहे. अंतिम फेरीत रोहन-ऋतुजाने पहिल्या मानांकित चायनीज तैपेईच्या लियांग एन शुओ आणि त्सुंग हाओ हुआंग यांचा २-६, ६-३, १०-४ (सुपर टायब्रेक) असा पराभव केला. सध्या सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हे ९वे सुवर्णपदक आहे.४३ वर्षीय रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले यांनी मिश्र दुहेरी टेनिसमध्ये सलामीचा सेट ६-२ असा गमावल्यानंतर शानदार पुनरागमन केले. त्यांनी सुपर टायब्रेक १०-४ असा जिंकला.
19व्या एशियन गेम्समध्ये भारताच्या मेडल्सची संख्या आता 36 वर पोहोचली आहे. यामध्ये 10 गोल्ड मेडल, 13 सिल्वर मेडल आणि 13 ब्रॉन्झ मेडल्सचा समावेश आहे.
SL/KA/SL
30 Sept. 2023