Asian Games – तब्बल ४१ वर्षांनंतर या क्रीडा प्रकारात भारताला सुवर्णपदक
हांगझोऊ, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला तिसरे सुवर्णपदक मिळाले आहे. घोडेस्वारी टीमने पदकावर नाव कोरले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या घोडेस्वारी पथकाने 41 वर्षांनतर गोल्ड पदक मिळवत इतिहास रचलाय. भारतीय घोडेस्वारी सुदीप्ती हजेला, दिव्यकृती सिंह, अंशु अग्रवाल आणि हृदय छेडा यांनी शानदार कामगिरी करत पदक पटकावले.
आशियाई क्रीडा स्पर्धेत घोडेस्वारी खेळामध्ये 40 वर्षांच्या इतिहासात भारताने प्रथमच सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. भारताचे घोडेस्वार अनुष, सुदीप्ती, दिव्यकीर्ती आणि हृदय यांनी अंतिम फेरीत चमकदार कामगिरी केली. अंतिम सामन्यात भारताच्या टीमने 209.205 गुण मिळवले. दिव्यकीर्तीला 68.176 गुण, हृदयला 69.941 गुण आणि अनुषला 71.088 गुण मिळाले. भारतीय संघ चीनपेक्षा 4.5 गुणांनी पुढे होता.
दरम्यान आज पुरुषांच्या सेलिंगमध्ये भारताच्या इबाद अलीने कांस्यपदक जिंकले. यापूर्वी नेहा ठाकूरने 28 गुणांसह रौप्यपदक जिंकले होते. भारताचे हे आजचे दुसरे पदक आहे. यासह आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात 14 पदके झाली आहेत. ज्यामध्ये तीन सोन्याचा समावेश आहे.
तर जलतरणात पुरुषांच्या 4×100 मीटर मेडले रिले संघाने राष्ट्रीय विक्रमासह अंतिम फेरी गाठली आहे. अंकिता रैनाने टेनिसची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. याआधी मंगळवारी हॉकीमध्ये भारताने सिंगापूरचा 16-1 असा पराभव केला. याशिवाय, ज्युदोमधील दोन खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची कामगिरी दिवसेंदिवस चांगली होत आहे. भारताला तिसऱ्या दिवशी तिसरे सुवर्णपदक मिळाले आहे त्याआधी भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेचा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले होते. भारताने श्रीलंका संघाचा 19 धावांनी पराभव केला होता. त्याआधी भारताने शूटिंगमध्ये गोल्ड मेडल जिंकले होते. आज घोडस्वार टीमने तिसरे सुवर्ण जिंकून दिलेय. सध्या भारताच्या एकूण पदकांची संख्या १४ इतकी झाली आहे. यामध्ये तीन सुवर्णपदकांचा समावेश आहे. त्याशिवाय चार रौप्य आणि सात कांस्य पदके मिळाली आहेत. मंगळवारी भारतीय खेळाडूंनी दोन कांस्य पदकेही पटकावली आहेत.
SL/KA/SL
26 Sept. 2023