Asian Games – आज भारताच्या खात्यात २ सुवर्ण पदकांसह आणखी ६ पदके

 Asian Games – आज भारताच्या खात्यात २ सुवर्ण पदकांसह आणखी ६ पदके

हांगझोऊ, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एशियन गेम्सच्या दुसऱ्या दिवशी (२५ सप्टेंबर) भारताने एकूण ६ पदके जिंकली. यात दोन सुवर्ण पदकांचा समावेश आहे. भारताने सांघिक नेमबाजी आणि महिला क्रिकेटमध्ये सुवर्ण पदक जिंकले भारतीय संघाने चीनमधील हांगझोऊ येथील एशियन गेम्स 2023 ची सुरुवात मोठ्या थाटात केली आहे. भारताने पहिल्या दिवशी (२४ सप्टेंबर) पहिल्याच दिवशी ५ पदकं जिंकली . पण त्यात एकही सुवर्णपदक मिळाले नाही. आता दुसऱ्या दिवशी भारताला १० मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. दिव्यांश सिंग पनवार, ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर आणि रुद्रांक्ष पाटील या त्रिकुटाने देशासाठी हे सुवर्णपदक जिंकले.नेमबाजांनी १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केल्यानंतर नौकानयन क्रीडा प्रकारात दोन कांस्यपदकं भारतीय खेळाडूंनी जिंकली.

आतापर्यंत भारताच्या पदकांची संख्या ११ झाली आहे. २ सुवर्ण, ३ रौप्य आणि ६ कांस्य पदकांसह भारत आज पदकतालिकेत सहाव्या स्थानी पोहोचला आहे. तर चिन, कोरिया आणि जपान हे देश अनुक्रमे ६९, ३३ आणि २१ पदकांसह प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थानी आहेत.

  • भारताचे पदकवीर
    मेहुली घोष, आशी चौकसे आणि रमिता जिंदाल, १० मीटर एअर रायफल टीम इव्हेंट (शूटिंग): रौप्य
  • अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग, पुरुषांची लाइटवेट डबल स्कल्स (रोइंग): रौप्य
  • बाबू लाल आणि लेख राम, पुरुष कॉक्सलेस दुहेरी (रोइंग): कांस्य
  • पुरुष कॉक्सड ८ संघ (रोइंग): रौप्य
  • रमिता जिंदल, महिला १० मीटर एअर रायफल (शूटिंग): कांस्य
  • ऐश्वर्या तोमर, रुद्रांक्ष पाटील आणि दिव्यांश पनवार, १० मीटर एअर रायफल टीम इव्हेंट (शूटिंग): सुवर्ण
  • आशिष, भीम सिंग, जसविंदर सिंग आणि पुनीत कुमार – पुरुष कॉक्सलेस 4 (रोइंग): कांस्य
  • परमिंदर सिंग, सतनाम सिंग, जाकर खान आणि सुखमीत सिंग – पुरुष क्वाड्रपल स्कल्स (रोइंग): कांस्य
  • ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर – पुरुष १० मीटर एअर रायफल (शूटिंग): कांस्य
  • अनिश, विजयवीर सिद्धू आणि आदर्श सिंग – पुरुष २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूल (शूटिंग): कांस्य
  • भारतीय महिला क्रिकेट संघ- क्रिकेट : सुवर्ण

SL/KA/SL

25 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *