Asia Cup स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, या दिवशी भारत-पाक आमने-सामने

 Asia Cup स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, या दिवशी भारत-पाक आमने-सामने

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बऱ्याच कालावधीनंतर भारत-पाक लढत पाहण्याची संधी मिळणार असल्याने क्रिकेट चाहते आशिया कप २०२३ च्या वेळापत्रकाची आतुरतेने वाट पाहत होते. आशियाई क्रिकेट परिषद आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांनी आज या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात ३० ऑगस्ट रोजी होणार आहे. तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सप्टेंबरला सामना होणार आहे. तर आशिया कप २०२३ चा अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी होणार आहे.

Asia Cup 2023 Schedule has been announced: आशिया चषक २०२३ ही स्पर्धा श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये संयुक्तपणे आयोजित केला जाणार आहे. आशिया चषक २०२३ चे आयोजन बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी पाकिस्तान दौरा करण्यास नकार दिला होता. त्यानंतर पीसीबीचे माजी अध्यक्ष नजम सेठी यांच्या नेतृत्वाखाली हायब्रीड मॉडेलचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. ज्याला सर्व देशांच्या बोर्डांनी मान्यता दिली होती. भारताचे सामने संपूर्णपणे श्रीलंकेत खेळवले जातील. त्याचबरोबर, भारत आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला, तरच अंतिम सामना श्रीलंकेत खेळवला जाईल.

आशिया कप २०२३ स्पर्धेतील सहभागी संघ –
आशिया चषक २०२३ भारत, श्रीलंका, अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. नेपाळ, पाकिस्तान आणि भारत हे गट-अ मध्ये आहेत. तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे गट-ब मध्ये आहेत. आशिया चषक २०२३ यावर्षी ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल.

आशिया कप २०२३ चे वेळापत्रक (फेरी नंबर -१)
३० ऑगस्ट – पाकिस्तान विरुद्ध नेपाळ, मुलतान
३१ ऑगस्ट – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका, कॅंडी
२ सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, कॅंडी
३ सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, लाहोर
४ सप्टेंबर – भारत विरुद्ध नेपाळ, कॅंडी
५ सप्टेंबर – नेपाळ विरुद्ध अफगाणिस्तान

सुपर-4 (फेरी नंबर -२)
६ सप्टेंबर – A1 विरुद्ध B2, लाहोर
९ सप्टेंबर – B1 विरुद्ध B2, कँडी
१० सप्टेंबर – AI विरुद्ध A2, कँडी
१२ सप्टेंबर – A2 विरुद्ध B1, डंबुला
१४ सप्टेंबर – A1 विरुद्ध B1, डंबुला
१५ सप्टेंबर – A2 विरुद्ध B2, डंबुला
१७ सप्टेंबर – अंतिम सामना

SL/KA/SL

19 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *