आश्रमशाळेत १६९ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा!

 आश्रमशाळेत १६९ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा!

सांगली दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):सांगली जिल्ह्यातील उमदी इथे एकूण १६९ रुग्ण विषबाढेमुळे ग्रामीण रुग्णालय माडग्याळ येथे दाखल करण्यात आले आहेत . त्यापैकी ७९ पेशंट सध्या ग्रामीण रुग्णालय माडग्याळ येथे उपचार घेत असून बाकीच्यांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

सांगलीच्या जत तालुक्यातल्या उमदी येथील आश्रमशाळेतील १६९ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाली असून २० विद्यार्थ्यांना मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

सोमवारी २८ ऑगस्ट रोजी पहाटे १ वाजेपर्यंत हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार उमदी (ता. जत, जि. सांगली) येथील समता अनुदानित (VJNT साठीची) आश्रमशाळेतील जवळपास १६९ विद्यार्थ्यांना रविवारी दि. २७ रोजी रात्री उशिरा अन्नातून विषबाधा (food poisoning) झाल्याची माहिती समोर आली आहे. सदर विद्यार्थ्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय, माडग्याळ आणि जत येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तेथे विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चांगली आहे.

ML/KA/PGB 28 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *