गोपाळकाल्याने पंढरपुरात आषाढी वारीची सांगता

सोलापूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आषाढी एकादशीची सांगता आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गोपाळकाल्याने झाली. गोपाळपूर येथे सर्व संतांच्या पालख्यात दाखल होऊन लाह्यांची मुक्त उधळण करत गोपाळकाला झाला. यानंतर सर्व संतांच्या पालख्या विठ्ठल मंदिरात विठ्ठल दर्शनासाठी दाखल झाल्या. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्ताई, संत निवृत्तीनाथ, संत सोपान काका, संत एकनाथ अशा सर्व संतांच्या पादुकांनी विठ्ठल दर्शन घेतले. यानंतर या सर्व संतांच्या पादुकांनी आषाढीची सांगता करत पंढरीचा निरोप घेतला. ज्ञानोबा , तुकाराम आणि हरिनामाचा जयघोष करत आज विठ्ठल मंदिरात आत्म्याची परमात्म्याची भेट झाली. त्यावेळी हरीनामाचा आणि विठू नामाचा मोठा गजर झाला. Ashadhi Vari ends in Pandharpur with Gopalkala
ML/ML/PGB
21 July 2024