आशा सेविका आणि आरोग्य सेविका मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर ठाम

 आशा सेविका आणि आरोग्य सेविका मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर ठाम

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी व निवृत्तीवेतन, प्रसूती विषयी फायदे, गटविमा योजना लागू करावी किंवा १५ हजार रुपये वार्षिक विम्याचा हप्ता द्यावा, दर महिन्याच्या १ ते १० तारखेपर्यंत वेतन मिळावे, महापालिकेच्या आरोग्यसेविकांच्या रिक्त जागांवर आशासे विकांची नियुक्ती करावी, आदी विविध मागण्यांसाठी मंगळवारी सकाळपासून आशा सेविका आणि आरोग्य सेविकांनी आझाद मैदानात बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा आशा सेविका आणि आरोग्य सेविकांनी घेतला आहे.त्यामुळे हे आंदोलन आणखी चिघळण्याची भीती व्यक्त होत आहे.
आरोग्य सेविका व आशा सेविका यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाची दखल घेत मुंबई महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी बुधवारी दुपारी २ वाजता सविस्तर चर्चा करण्यासाठी वेळ दिली होती. बुधवारी दुपारी दीड ते दोन तास झालेल्या चर्चेमध्ये कोणताच सकारात्मक निर्णय झाला नाही. त्यामुळे आशा सेविका व आरोग्य सेविका निराश झाल्या. मात्र सायंकाळपर्यंत मुख्यमंत्री कार्यालयातून चर्चेसाठी बोलावणे येण्याची शक्यता होती. मात्र मुख्यमंत्र्यांकडूनही बोलावणे न आलेल्या संतप्त झालेल्या आशा सेविका व आरोग्य सेविका आक्रमक झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाल्याशिवाय माघार घ्यायची नाही, या भूमिकेवर त्या ठाम आहेत. Asha Sevika and Arogya Sevika insisted on the Chief Minister’s visit

ML/ML/PGB
13 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *