खातेवाटप रखडलेलेच , चेंडू अखेर दिल्लीच्या कोर्टात दाखल
मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दोन तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होऊनही अद्याप दहा दिवस उलटूनही नव्या मंत्र्यांना खातेवाटप झालेले नाही, शिंदे गटाने विरोध केल्यामुळे आता हा विषय दिल्ली दरबारी पोहोचला असून सत्तारूढ पक्षाचे तिन्ही नेते आज रात्री दिल्ली दरबारी चर्चा करतील.
शिंदे गट आणि भाजपा यांच्याकडे आलेली काही खाती नव्याने सामील झालेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला द्यायची आहेत , त्यातही वित्त खाते अजित पवार यांना हवे आहे, भाजपा ने त्याला होकार दिला असला तरी शिंदे गटाचा त्याला जोरदार विरोध आहे.As the account allocation stalled, the ball was finally filed in the court of Delhi
याशिवाय ऊर्जा , जलसंपदा , सामाजिक न्याय आदी खात्यांवरूनही मतभेद आहेत . ही सर्व खाती राष्ट्रवादी ला हवी आहेत. मात्र भाजपा आणि शिंदे गटाच्या आणखी काही आमदारांना मंत्री करायचे आहे, त्यांना कोणती खाती द्यायची असाही प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे अद्याप हा घोळ सुटलेला नाही.
गेले दोन दिवस एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सातत्याने बैठका होत असून तासनतास चर्चा होऊनही मार्ग निघत नसल्याचे चित्र आहे. त्यातच गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या आमदारांना मंत्री कधी करायचे याचाही मुहूर्त ठरत नाही. अखेर हा सर्व विषय आता दिल्ली दरबारी पोहोचला असून अजित पवार आज सायंकाळी दिल्लीला रवाना झाले तर फडणवीस आणि शिंदे देखील उशिरा दिल्लीत दाखल होतील. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा होऊन त्यात यावर मार्ग निघण्याची शक्यता आहे.
ML/KA/PGB
12 July 2023