आजारी पडताच पालकमंत्री पदाचा विषय लागला मार्गी
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सत्तेत सहभागी झाल्यानंतरही मनासारखे घडत नसल्याने अजित पवार यांचा राजकीय आजार वाढला आणि अखेर काल रात्री दिल्लीत खलबते झाल्यावर पालकमंत्री पदाचा वाद बऱ्याच अंशी सुटला आहे मात्र अजूनही नाशिक आणि रायगड हे जिल्हे वादाताच आहेत.
काल मंत्रिमंडळ बैठकीत गैरहजर राहणाऱ्या अजित पवार यांना घशाचा विकार झाल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले होते मात्र प्रत्यक्षात तो राजकीय आजार होता हे आज स्पष्ट झाले आहे. अजितदादांना हवे असणारे पुण्याचे पालकमंत्री पद त्यांनी आज त्यांनी पदरात पाडून घेतले. आज बारा जिल्ह्यांचे पालकमंत्री नव्याने जाहीर करण्यात आले त्यात अजितदादांना पुण्याचे, धनंजय मुंडे यांना बीडचे तर हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरचे पालकमंत्री पद पदरात पडले आहे.
याबाबत काल रात्री उशिरा दिल्लीत मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस दाखल झाले, तिथे खलबते झाल्यावर आज हा निर्णय झाला.
आज बारा जिल्ह्यांचे पालकमंत्री नव्याने जाहीर करण्यात आले त्यात चंद्रकांत पाटील यांना पुण्यावरून सोलापूर जिल्हा देण्यात आला आहे, दीपक केसरकर यांना कोल्हापूर मधून काढून तो हसन मुश्रीफ यांना तर अतुल सावे यांना बीडमधून काढून धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. मात्र छगन भुजबळ आणि आदिती तटकरे यांना हवे असलेले नाशिक आणि रायगडचे पालकमंत्री पद अद्याप मिळालेले नाही. त्यावर आपण नाराज नसल्याचे ते बोलत असले तरी चर्चेतून मार्ग निघेल असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.
पालकमंत्री पद, मंत्रिमंडळ विस्तार , महमंडळांचे वाटप यावरून आधी शिंदे गट नाराज आहेच त्यात आता अजित पवार गटाची भर पडली आहे. भाजपाच्या निष्ठावंतांना ताटकळत बसावे लागले असून तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. पुढील आठवड्यात महामंडळ नियुक्त्या नक्की करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून त्यात पन्नास टक्के भाजपाला तर शिंदे , अजितदादा गटाला प्रत्येकी पंचवीस टक्के वाटा मिळण्याची चर्चा आहे. यात थोडे मागे पुढे होऊन अंतिम निर्णय होईल आणि कार्यकर्त्यांना पदे देऊन लोकसभा निवडणुकीसाठी सिद्ध केले जाईल अशी अपेक्षा आहे.As soon as he fell ill, the matter of the guardian minister’s post came up
ML/KA/PGB
4 Oct 2023