आर्थिक घोटाळा प्रकरणी तब्बल २५० वर्षांची शिक्षा
सिहोर,दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काही गुन्ह्यांमध्ये गुन्हेगाराला न्यायालयाकडून अगदी चमत्कारिक आणि प्रत्यक्षात आणण्यास अशक्य अशा शिक्षा सुनावल्या जातात. अशीच एक शिक्षा मध्यप्रदेशातील सिहोल येथील न्यायालयाने पुण्यातील एका व्यक्तीला आर्थिक घोटाळा प्रकरणी सुनावली आहे. एका आरोपीला दहा, वीस वर्ष नाही तर तब्बल २५० वर्षांची शिक्षा झाली आहे. चिटफंड प्रकरणात शिक्षा झालेल्या पुणे येथील आरोपीचे नाव बाळासाहेब भापकर असे आहे.
न्यायालयाने शिक्षा दिलेले प्रकरण फसवणुकीचे आहे. साईप्रसाद कंपनीच्या संचालकानी चिंटफंड कंपनी सुरु केली. त्यामाध्यमातून कोट्यवधी रुपयांमध्ये लोकांची फसवणूक केली. न्यायालयाने बाळासाहेब भापकर यांना 250 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. कंपनीच्या सिहोर शाखेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
भापकर याच्यासह कंपनीचे सीहोर शाखेचे कर्मचारी दीपसिंग वर्मा, लखनलाल वर्मा, जितेंद्र कुमार आणि राजेश परमार यांनाही प्रत्येकी पाच वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे. सिहोर जिल्हा न्यायालयाचे विशेष न्यायाधीश संजयकुमार शाही यांनी ही शिक्षा दिली.
आरोपी बाळासाहेब भापकर याने साई प्रसाद नावाने चिटफंड कंपनी स्थापन केली होती. या कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांना पाच वर्षांत दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवले. यामुळे चांगल्या नफ्याच्या आमिषाने अनेकांनी चिटफंड कंपनीत पैसे गुंतवले. मात्र पैसे देण्याची वेळ आली तेव्हा कंपनीला कुलूप लावून पळ काढला. या प्रकरणी 2016 मध्ये सीहोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
SL/KA/SL