रक्षाबंधनाच्या निमित्ताने ST च्या तिजोरीत तब्बल १२१ कोटींची भर

 रक्षाबंधनाच्या निमित्ताने ST च्या तिजोरीत तब्बल १२१ कोटींची भर

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या तीन सुट्ट्यांच्या काळात एसटी महामंडळाच्या तिजोरीत १२१ कोटींची भर पडली आहे.१७ ते २० ऑगस्ट या चार दिवसांमध्ये प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या एसटीमधून महामंडळाला १२१ कोटी रुपयांची उत्पन्न मिळाले आहे.विशेष म्हणजे २० ऑगस्ट रोजी एका दिवशीच तब्बल ३५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. रक्षाबंधन सणानिमित्त एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांनी आभार मानले आहेत.

यंदाच्या आर्थिक वर्षातील एसटी महामंडळाचे हे विक्रमी उत्पन्न आहे.एसटी महामंडळाला कोरोना काळात मोठा तोटा झाला होता.त्यानंतर आता हळूहळू एसटी महामंडळाचा गाडा रुळांवर येत आहे.दरवर्षी एसटीला रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन दिवसात विक्रमी उत्पन्न मिळत असते. कारण, यादिवशी मोठ्या प्रमाणावर प्रवास केला जातो.यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एसटी प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.रक्षाबंधनच्या दिवशी सोमवारी ३० कोटी आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी मिळून तब्बल ३५ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे.या दोन दिवसांत १ कोटी ६ लाख प्रवाशांनी एसटीमधून प्रवास केला. त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या तब्बल ५० लाख होती.

SL/ML/SL

22 August 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *