तब्बल ८०० क्विंटल कापसाची गंजी जळून खाक
अमरावती दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमरावती जिल्ह्यातील पथ्रोट येथील आलबाग शिवारातल्या श्याम कॉटन इंडस्ट्रीज मधील कापसाच्या गंजीला भीषण आग लागली. या आगीत आठशे क्विंटल कापूस जळून खाक झाला आहे.
श्याम कॉटन इंडस्ट्रीज मध्ये नेहमीप्रमाणे मजूर मशीनवर काम करीत असताना अचानक आग लागली. अगदी काही क्षणातच आगीने मोठे रुप धारण केले. सर्वांनी धावपळ करत उपस्थित मजुरांच्या साह्याने इंडस्ट्रीज मध्ये असलेल्या पाण्याच्या व्यवस्थेनुसार आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
कापसाच्या गंजीला लागलेल्या आगीत साठ ते सत्तर लाख रुपयांचे नुकसान झाले. आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही.
ML/KA/SL
11 Jan. 2023